शंकराऽऽ चरण मी तव धरिले, रात्रंदिनी मी अज्ञानी हृदयी तुज । मी स्मरिलेऽऽ शंकराऽऽ चरण मी तव धरीले ॥धृ॥
नेत्रकमल नित ते मिटलेले, ध्यान शीवाचे मी धरिले, तवगुण गाता हृदयी स्मरता, रूप तुझे ते दिसलेऽऽ शंकर ॥१॥
शिव नामाचा होतो गजर । गर्जुनी म्हणती शंभो शंकर, नाम शिवाचे पडत कानी । पापी किती तरी तरले शंकरा ॥२॥
नामा म्हणे हा शिव नामाचा, वर्णु कती मी महिमा त्याचा, जो जो हृदयी शिव जप गाई जीवन त्याचे फुलले शंकराऽऽ ॥३॥