दोष रे जातील अनंत जन्माचे । पाय त्या देवाचे न सोडावे ॥१॥
न सोडावे पाय निश्चय करा । आळवा शारंगधरा भावबळे ॥२॥
धरूनी केशवा आणा भावबळे । पापीया न कळे काही केल्या ॥३॥
न कळे तो देव संतसंगा वाचूनी । वासना जाळूनी शुद्ध करा ॥४॥
शुद्ध करा मन देहातीत व्हावे । वस्तुसी ओळखावी तुका म्हणे ॥५॥