पैल तो गे काऊ कोकता हे, शकुन घे माथे सांगता हे ॥धृ॥
उड उड रे काऊ, तुझे सोन्याचे मढविन पाऊ, पाहुणे पंढरी रावू घरासही येती ॥१॥
दही भाताची हंडी लावीन तुझे तोंडी, जीवा कधी ते, तयाची गोडी सांग वेगे, दुधे भरूनि चाटी, लावूनि तुझे ओठी, सत्य सांगे ओठी विठू देईल काही ॥२॥
आंबे या डहाळी, फळे चुंबी रसाळी । आधीची रे काही शकून सांगे ॥३॥