धन्य देहू गांवा, पुण्यभुमि ठाव । पांडुरंग देव तेथे पांडुरंग देव ॥धृ॥
त्याच देहू गावी होते तुकाराम संत । वाणीयाचा धंदा होता परी ते विरक्त ॥
देह तिजोरीत होती भक्तीचीच ठेव ॥१॥
नाम साधनी रंगती, टाळ वीणा हाती । पूर्ण आत्मसात केली विठ्ठलाची भक्ती । दया क्षमा सर्वाभूती नम्र तो स्वभाव ॥२॥
भाव तिथे देव आहे दाविती प्रचीती । भक्ती मुक्ति साधुनी अंती वैकुंठास जाती । असा दावियेला आम्हा एकनिष्ठा भाव ॥३॥