गोरस डोईवर घेऊन, गोरस कृष्णाला घेऊन, निघाली गौळण वृंदावनी ॥धृ॥
पिवळी पैठण करीसी शोभे, कंचुकी पाचुची ही साजे, भाळी बिजवरा, नथ नाकीची रुणझुणती पैजणे ॥१॥
ठुमकत मुरडत राधा आली, कान कुंडले डुलू लागली, ओठ रंगले, गोर्या भाळी चंद्रकोर ॥२॥
बारा सोळा मिळूनी गौळणी, तर्हेतर्हेची बसने लेवूनी, भर पिचकारी घे गिरधारी, उडवी भांगातूनी ॥३॥
होळी खेळता रात्र संपली उगवे दिनकर पहाट सरली, लगबग जाती गोकुळनारी, जाती त्या परतूनी ॥४॥