उत्तम जन्मा आले परन्तु देह वाया गेला चित्त देऊनी ऐक देवा सांगते मी तुजला, तुझ्या चरणी चित्त लागु दे हेची देणे मजला, अज्ञाना मधें बूडुनी गेला, व्यर्थ काळ माझा ॥ माझ्या वेळी नको कठीन होऊ धाव चक्रपाणी, षडरिपु मजला व्यर्थ गांजीती त्यासी टाकी छेदूनी ॥धृ॥१॥
चंचल मन हे किती तरी माझे कदापि आवरे ना, दहा जणामधे मोठेपणा का काहीच समझे ना, हरी हरी हरी भजुनी चित्त शांत घ्या करुनी अहंकाराने घर घेतले मूढ मती म्हणूनी ॥२॥
पूर्वजांची काय व्यवस्था द्यावी सोडोनी, एकनाथा घरी गंध उगळले घातले पाणी, ध्रुव बाळ हा स्थापन केला अढळपदी नेऊनी ॥३॥