संताच्या संगती, अमृत सेवन त्याने हे जीवन होई साथी ॥धृ॥
कथा भजनात रमावे, गुंगावे, संयमी असावे मनामाजी ॥१॥
टाळमृदंगाचा होतसे गजर अवघे पंढरपूर, अवतरे ॥२॥
कीर्तनाची गोडी, जेणे चाखियेली, ब्रह्मानंदी टाळी लागे त्याची ॥३॥
नाममंत्र गावा । विठ्ठल जपावा, भक्तीमध्ये जावा सर्व काल ॥४॥