गुरु चरणाची घडली सेवा । हाच जीवनी अमोल ठेवा ॥धृ॥
नर जन्माचे सार्थक झाले, उपकाराचे ओझे उरले, क्षणभर जेव्हा डोळे मिटले, भेदभाव हा नुरला देवा ॥१॥
रूप पहाता अवधुताचे दर्शन घडले दिव्यत्वाचे, शब्द जुळविती प्रत्ययाचे । साथ द्यावया तुझ्या खडावा ॥२॥
दिली मला तू अमृतवाणी, काय वाहू मी तुझिया चरणी । समाधीतल्या अमर क्षणांनी, उजळे माझे जीवन देवा ॥३॥