आनंदाचा कंद उभा पांडुरंग ॥धृ॥
गोपाळांचा संग भोवती उभा, चंद्रभागोतिरी भक्त पुंडलिक । भक्त अलौकिक गर्जताती ॥१॥
भोळे आणि भाळे गाती साबडे, विठ्ठला आवडे प्रेम त्याचे ॥२॥
नर आणि नारी आनंदे गर्जती, होतो जयजयकार भीमातिरी ॥३॥
एका जनार्दनी प्रेमळ सज्जन, करीती भजन विठ्ठलाचे ॥४॥