किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला ॥धृ॥
रास खेळू चला, रंग उधळू चला, आला आला ग कान्हा आला ॥१॥
अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी । गोकुळ अवतरले, गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण थरथरले ॥२॥
कान्हा दिसतो उठून, गोपी आल्या नटुन, नव्या नवतीचा शृंगार केला ॥३॥
मूर्त अशी साजरी ग ओठावरी बासरी । भुलले सुरासंगती । कोणी म्हणा गोविंद । कोणी गोपाळ, कान्ह्याला नावे किती मी किती सांगू मी ॥४॥
रोज खोड्या करून । गोपबाळे जमून । सांज सकाळ गोपाळ काला ॥५॥
खेळ असा रंगला ग, खेळणारा दंगला ग । टिपरीवर टिपरी पडे ।
फेर धरती दिशा । धुंद झाली निशा । रास रंगाच्या वार्यात न्हाला, आज आनंदी आनंद झाला ॥६॥