रामाला मी गुंतले कामाला, सावळ्या रामाला मी गुंतले कामाला, भजन करावे रामाचे, सिताराम चंद्राचे, सार्थक होईल जन्माचे । व्यर्थ कष्टविली माय जन्मा येऊनी केले, योनी फिरता चौर्याऐशी भक्तीसाठी श्रमलासी, किंचित पुण्य येता हाती, झाली नरदेहाची प्राप्ती । आनंदले माय बाप म्हणती उजळवा दीप, तुका म्हणे हेची फळ भजनविना बुडविला कुळ । देव रंगारी बा रंगारी त्रिभुवनाचा रंग करी, मायपट रंगविले पंच तत्व मिळविले लक्ष चौर्यांशीचे ठसे वेगळाचे केले कैसे । पंचतत्वाची करूनी मूस आत ओतला ब्रह्म रस, तुका म्हणे चारी खानी भट्ट्या चालल्या अंगणी । पक्षी अंगणात आले आपला चारा चरूनी गेले, असे असावे संसारी जोवरी आयुष्याची दोरी, मुली घर चार मांडीला खेळ मोडोनी टाकीला, वाटसरू वाट आले, प्रात:काळी उठूनी गेले, वाटसरू वाट आले मार्गी चाल भेटले, नाही ममतेला गुंतले, एका जनार्दनी जान असे असता भय कोणा । स्त्री, पुत्र, कलत्र हेची मायवंत शेवटचे आप्त कोणी नाही, यमाची या हाती बांधोनिया देती भूषण ते घेती काढोनिया, अशा या चोरांचा काय हो विश्वास धरली तुझी कास रामराया । संसारी असावे देव आळवावे कुटुंबी रहावे सर्वकाळ । वावगे भाषण संसारी नसावे तरी माझ्या देवा आवडेना । राम म्हणता ग्रासोगासी तो नर जेवला उपवासी, राम म्हणता करी धंदा तो नर समाधीस्त सदा, राम राम गाई, तुका वंदी त्याचे पाय, आळवीता धाव घाली अशी कृपेची माऊली ऊंच वाढला एरंड तरी का होईल ईक्षु दंड, जरीका भेटला भगवंत तरीका भेटेल भगवंत । काय करावा चांगला नाही अंतरी, रंगला मोत्यासारखा शिंपला, परी तो आपुली मोल गेलो कस्तुरी सारखा कोळसा, भाव अन्तरी वेगळा, बाळ यशोदेचा तान्हें बळीरामाहून ठेंगणे । विटेवरी उभी नीट पुंडलीक केले नीट स्वानन्दाची लेणी, तेथूनी निघाली मुक्ताई तेथे मुक्ताई निघाली । ऐसा कोण आहे धनी, घाली जनाबाईची वेणी ऐसा कोण आहे क्षत्री, धरी दासावर छत्री । ऐसा कोण आहे खासा । नरपदी बैसवी दासा, तुका म्हणे विठ्ठल राजे तुमचे नाव तुम्हा साजे । ऐसे कधी करशील देवा गीत गावू अनुभवा, नित्य मागू मधुकरी, पोथी वाचू ज्ञानेश्वरी । गावे षड्शास्त्रे सांगणे गीता भागवत तुक्यादासाचे जीवन गाथा भागवत जाना ।