किती आनंदी आनंद झाला भजनाला पांडुरंग आला ॥धृ॥
ऐकूनी टाळ मृदंग आला नाचत हा गोविंद । संगे घेऊनी भक्तांचा मेळा, भजनाला पांडुरंग आला हो ॥१॥
रामनाम ऐकता कानी, पहा आनंदला हो मनी भक्ता संगती नाचू लागला ॥२॥
रामनामाची ऐकूनी धुनी गेला विठ्ठला होऊनी, शुद्ध पितांबराची नाही त्याला ॥३॥
एका जनार्दनी विठ्ठला भजनाला, रंग चढविला जय विठ्ठल विठ्ठल बोला ॥४॥