ईकडे पंढरी पंढरी तिकडे जेजुरी जेजुरी ॥धृ॥
ईकडे राही रखुमाबाई । तिकडे म्हाळसा बाणाई । ईकडे वाहे चंद्रभागा तिकडे करावी श्रीगंगा । ईकडे बुक्क्याचे लेण । तिकडे भंडार भूषण । ईकडे विटेवरी उभा । तिकडे घोड्या वरी शोभा । इकडे पुंडलीक वरदान । तिकडे हे गळी परदान । इकडे साधुसंत येती । तिकडे मुरळ्या नाचती । इकडे पताकांचा भार, तिकडे दिवट्यांचा गजर ॥