कृष्णा पुरेना थट्टा कितीही खडा घड्याला मारू नको, या राधेला अडवू नको ॥धृ॥
जलामृते हा घट भरलेला, घेऊनी जाते मजसी घराला, सोड वाट रे झणी गोपाळा, घर परतण्या उशीर नको ॥१॥
हुसळीत जल हे भिजते साडी असली कसली भलती खोडी काय वाटते तुजला गोडी, वृथा मुकुंदा छळू नको ॥२॥
तुझ्या संगती क्षणभर येता, विसरूनी जाते काम सर्वथा, ओढ लागली माझ्या जीवा, भुरळ मनाला घालू नको रे ॥३॥