आकाशा पांघरोनी जग शांत झोपते आहे, घेऊनी एकतारी गातो कबीर दोहे । गगनात हसती या स्वप्नील मंदतारा । वेलीवरी सुखाने निजला दमून वारा । कालिंदीच्या तीरी या जल संथ संथ वारे ॥१॥
भरला स्वरात त्याच्या भक्तीतला सुगंध ओठात आगळाच आनंद काही धुंद । त्याच्या समोर पुढती साक्षात देव आहे ॥२॥
काहुर अंतरी या भजनात लोप होई । भक्तीत श्रीहरीच्या मन हे रमून जाई ।
उघडून लोचनांना तो दिव्य रूप पाहे ॥३॥