ज्यास पाहता जीवन माझे धन्य व्हावयाचे रघुनंदन यायचे ॥धृ॥
ज्या शबरीचे शरीर जर्जर, जगते एका अभिलाषेवर रामपदासी स्पर्शून पुजून परलोकी जायचे ॥१॥
माझ्या मनीची शूचीभुर्तता, पूजीत येती इष्ट देवता, ज्यास पाहण्या शीणले लोचन, तेच पुढे पाहायचे ॥२॥
तुम्हा रघुवरा पुजीन जेव्हा, चरणी अर्पिण हृदया तेव्हा, खाऊनी उष्टी बोरे देवा, तृष्ट तुम्ही व्हावयाचे ॥३॥