माझी कोण गती सांग पंढरीगाथा, तारीसी अनाथा, केव्हा मला ॥धृ॥
मनापासूनीया सांगा मज प्रती आलो काकुळती जीविचिया ॥१॥
न बोलसी कारे धरिसी अबोला, कोणासी विठ्ठला शरण जाऊ ॥२॥
कोणासी सांकडे घालावे हे सांग नको धरू राग दीनावरी ॥३॥
नामा म्हणे देवा अनाथाच्या नाथा, कृपाळूवा कांता रखुमाईच्या ॥४॥