ऐका प्राण्या गोष्ट थोडी, कोणाची मालमाडी हे इथेच राहील कुडी, मग निघेल स्वारी सडी, संग येईना मनी हा फुटका, कोणी कसेल बनेल, घटका काळ क्षणात करील मटका, हा अभिमान लटका, कोणी कसेल बनेल घटका ॥धृ॥१॥
तू विचार करुनी पाहे, कोणाचे बाप मां ये, बंधु बहिण भाऊजई, हरी वाचूनी दैवत नाही, गुरु वाचून न मिळे सुटका कोणी कसेल बनेल घटका ॥२॥
तू विचार करुन पहा की, कोणाच्या लेक लेकी ते उगवून घेतील बाकी, कोणी नाही प्राणाची सखी राम नामाचा घ्या तुम्ही घुटका, कोणी कसेल बनेल घडका ॥३॥
घडो घडी स्मरा श्रीरामा, ते येईल तुमचा कामा, इतके सांगुनी गेले निजधामा, उद्धरीले तुकारामा देहा सहित गेले वैकुण्ठा, कोणी कसेल बनेल घटका ॥४॥