दुनियाला भ्रांती भाविकाला शांती । साधुची वृत्ति लीन झाली ॥१॥
लीन झाली वृती ब्रह्माते मिळाले । जळात आटले लवण जैसे ॥२॥
लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी । येत नाही खरे त्यातुनिया ॥३॥
त्यासारिखे तुम्ही जाणा साधुवृत्ती । पुन्हा न मिळीती मायाजाळी ॥४॥
मायाजाळ त्याला पुन्हा रे बाधेना । सत्य सत्य जाणा तुका म्हणे ॥५॥