हरीची ऐकताच मुरली, राधिका राधिकान उरली ॥धृ॥
आसावरीचे सुर कोवळे पहाट वारा पिऊनी आले, घुसळण करता हात थांबले डेर्यामधूनी दह्यादूधातूनी यमुना अवतरली ॥१॥
काजळातही दिसे सावळा, कुंकूवातूनी अधर कोवळा, कुंडलातूनी दंत झळकता, दर्पणातही लोचनातूनी हसला वनमाळी ॥२॥
वेड असे कसे विसरावे फुलातूनी गंधा सोडावे, नभातूनी रंगा वगळावे, वेडी राधा वेडा माधव वेडी ती मुरली ॥३॥