प्रतीदिन दर्शन घेतच रहावे । भवसागर हा तरून जावे । करील कृपा तो शिवशंकर । एक हो आपला सोमेश्वर ॥धृ॥
नको जाऊ पर्वतीला नका करू अरण्येश्वर, सुमनाने पुजा सोमेश्वर करील कृपा तो शिवशंकर । एक हो आपुला, सोमेश्वर ॥१॥
धन सम्पति देईन तुम्हा, आणि पुत्र देईन तुम्हा, सर्व दयाचे हे भंडार ॥२॥
अनन्य भावे शरण मी तुम्ही । भक्ती वर तुम्ही द्यावे आम्हां चुकवा आमची येरझार ॥३॥