अहर्निंशी सदा परमार्थ करावा । पाय न ठेवावा आडमार्गी ॥१॥
आडमार्गी कोणी तर ते जातील । त्यातून काढील तोचि ज्ञानी ॥२॥
तोची ज्ञानी खरा तारी दुनियासी । वेळोवेळी त्यासी शरण जावे ॥३॥
आपण तरेल नव्हे ते नवल । कुठे उद्धरील सर्वांची तो ॥४॥
शरण गेलीयाने काय होते फळ । तुका म्हणे कुळ उद्धारिले ॥५॥