गेली त्याची जाण तोची परब्रह्म झाला । अंतरी निवाला पूर्णपणे ॥१॥
राहतो कैशा रिती त्याची आता स्थिती सांगतो मी ॥२॥
सांगतो मी तुम्हा ऐका मनोगत । राहतो मूर्खवत जगामाजी ॥३॥
जगात पिशाच्च अंतरी शहाणा । सदा ब्रह्मीजाणा निमग्न तो ॥४॥
निमग्न तो सदा जैसा मकरंद । अंतर्बाह्य भेद वेगळाले भेद किती त्या असती ।
हद्ग त्याची गती न कळे कोणा ॥५॥
नकळे कोणाला त्याचे हेची वर्म । योग जाणे वर्म खूण त्याची जाणे तैसे जे असती । तुका म्हणे भ्रांती दुनियाला ॥६॥