नाम तुझे ऐकोनिया आलो साईनाथ । नाम तुझे ऐकोनिया आलो साईनाथ । बैसोनिया दारी तुझ्या गाते मी संगीत ॥धृ॥
गीत तुझे गाता गाता भान हरूनी गेले । दिव्य दर्शनाने तुझ्या धन्य झाले । ऐकलेस माझे साई, अर्थहीन गीत ॥१॥
थोर तुझा महिमा साई, कळेना जगास । वास तुझा जगती असूनी ना कळे कुणास । बुद्धीहीन गातो तुझे प्रभु साई गीत ॥२॥
स्वर संगीताच्या रूपे, योग तुझा यावा । तुझ्या दर्शनाचा मजला, लाभजगी व्हावा । हिच आशा शेवटची मी, धरूनी उरांत ॥३॥