हा देह निर्मिला कोणी, तेव्हांच गेले विसरूनी, कोणी केले गृह पाळ देहाचा धरूनी अभिमान, एक करिता नारायण म्हणे हाच देव भगवान मी म्हणुनी ताडीले काम क्रोधाशी मारीले, मी म्हणुनी आपली जागा, मीपणांत मोठा दगा, मी पणा सोडूनी वागा बहुतांचा झाला वाका ॥ तू अंतकाळीचा सखा, का राम येई न मुखा । ही पूर्वजन्मीची रेखा, का राम येईन मुखा ॥धृ॥१॥
जेव्हा होता मातेच्या पोटी उदरात नरका गाठी बादील तुला किरे देठी, पाजिली तुला रस वाटी पडला होता कीरे बन्दीखानी, तुझी देह किरे उपराठी, तेथे कसला माता पिता त्याचा विचार कर रे आता ॥२॥
मातेच्या, चरणी तुझ निर्मिले तेथे कोठुन पैदा झाले बोल बोले चौवड्यावर चाल चाले मग मोठे राव झाले मग मिळविले शहाणपण मग मिळवीले बहुत धन, धन दौलत मजपासूनी ॥३॥
ही पुरी पुण्याई सरली मग विद्या झटपट हरली बुडालो ठाई चे ठाई मग मी ऊंच झालो ताठा, जिकडे तिकडे लावीले वाटा, गुरू अन्त काळीचा सखा का राम येईना मुखा ॥४॥