श्री अष्टविनायक मंगलमूर्ती पाहे मी दिनरात, लावूनी हृदयाची फुलवात ॥धृ॥
थेऊरवासी श्री चिंतामणी, श्री विनायक महडवासिनी । लेण्याद्रिची श्री गिरीजात्मक, मूर्ती नेत्रीच्या निरांजनात ॥१॥
पालीचा श्री बल्लाळेश्वर, गिरवित माळा मुकुट शिरावर । मोरेगांवच श्री मोरेश्वर शोभते निज हृदयात ॥ श्री विघ्नेश्वर ओझरची ती आणि रांजणची श्री गणपती विघ्नटेक, श्री सिद्धी विनायक मूर्त प्रगटली मन् मनांत ॥३॥