गोविंद गोविंद बोल रे ब्रह्मानंदी डोल रे, माया मोह प्रपंच सारे, हरबर्याचे फोल रे ॥
नाम घ्या मुखात सांगू नका लोकात, आधी टाका जकात, मग जा झोकात ।
इथं कुंठ राहायचं मुक्कामाला जायचे सुखरूप होण्यासाठी रामनाम घ्यायचे ।
विठोबाला तुळशी गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा ।
भजन करावे रामाचे, सार्थक होईल जन्माचे,
वदवद जिव्हे रामनाम, अनेक जिव्हे न करी काम,
हिरवागार तुळशीपाला, आवड मोठी गोपाळाला
तुळशीमंजीरीच्या माळा प्रेमे वाहू विठ्ठलाला,
गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु
गुरुदत्ता गुरुदत्ता हरली ममा भवचिंता
दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम.