शौनक पुसती नैमिष्यरण्य कौतुक सुताला अरण्य कौतुक सुताला । बहुत पुराणे जरी ऐकीली संशय चित्ताला । कलीयुगी उद्धार येथूनी सुता कसा होईल । जगताला वदावे कसा होईल जगताला । इतके ऐकूनी सुत पुराणे प्रती उत्तर दिधले । ऐका श्रीमत भागवताते शुक मुनाने कथिले । पर पुरुषोत्तम परिक्षीतीने हृदया अंतरी जतीले ॥धृ॥१॥
श्री नारायण सृष्टी आरंभी ब्रह्मासी बोधी । शुक उपदेशी परिक्षीतीला कलियुगाच्या आधी । अवघे अवगत परस्परासी कलीकाल मशी बांधी । गर्वासी अवधान पाहिजेकृपा करुनी दिधले ॥२॥
पुसतसे व्यासमुनी प्रती नारद मुनी वदला । भगवत नीज आख्यान करावे सुख होईल जगताला । भगवत गुण गण मज ऐकोनी नीज देह तजीला ॥ हरीस्तव ॥ मग ब्रह्मापासूनी जन्मलो स्मृति मज पहिली भक्त सुख स्मृति पहिली ॥३॥
परिक्षितीचे पुण्य हरीने गर्भी रक्षिले नीज भक्ती । शुभ कालेशु नातु जन्मले पांडव करु कुळती । गोब्राह्मण प्रतिपालक परिक्षिप आहे विष्णु भक्ति । द्विगविजय कलीविघ्न करुनी सर्व शत्रू वधिले ॥४॥
धरणी धर्मा परस्पर कष्टी गर्वरूपी कळवितो । पाहूनी परिक्षित बोले धेनुते कोण तुला छळितो बघतो शुद्रा कथा काय रे मारीन तुज पाहिले, द्वेषाग्नीचा धूप परंतू शुद्र बाळ दिसतो दंडिकाष्ठ घेऊनी गरीब तो झडून वनी वळतो । वदतो शुद्रा कथा काय रे मारुन तुज पहिले ॥५॥
वृषभा तुझे कोण मोडिले तीन पाय सांगा बोला हे संदेह टाकूनी बोला हे सर्व भीति टाका श्रीरंगाचे दास जरी आम्ही भरलो मनी रागा । बघतो शुद्रा कथा काय रे मारीन तुज पहिले ॥६॥
प्रतिउत्तर मग धर्म देतसे कार्य माझे मारी । काय मी सांगू राया तुजला जाणसी स्वविचारी । खड्ग काढिले कलीशी वधाया क्रोध ना मनी मारी आज पासूनी शरण राजिया चरण तुझे नमिले ॥७॥
आज पासुनी वैष्णवास मी कांही पीडा करीना । ठाव देऊनी राया मजला राहीन स्वस्थ मना । राजा म्हणे मग वास करी तू पाहूनी कनक धना । ऐसा कलीचा निग्रह करोनी नीज भुवना गेला राजा नीज भुवना गेला ॥८॥
कोण एके दिवशी मृगया जाता राजा बहु श्रमला राजा म्हणे मग तृष्णा लागली जीवन दे मजला । ऋणी ध्यानस्थ काही न बोले राजा क्रोधावला । शीघ्रही जाता सर्प कलेवरी ऋषीकंठी सुतला ॥९॥
ऋषीचा पुत्र श्रृंगऋषी मग क्रोधची धर्माने शाप दिधला भूपति लागे विंधीती अपमाने । आज पासूनी साता दिवसा तक्षक वर्माने, मृत्यु पावेल परिक्षीत राजा आपल्या कर्माने, त्यास मग ऋषीपुत्राने प्रति मज जाणविले ॥१०॥
राजा म्हणे मग पूर्ण अनुग्रह झाला मज रता । ह्या देहाचे सार्थक करुनी जाईन विष्णूपदा । गंगेच्या तीरी जाऊनी बसला सोडूनी राज पदा । ऋषी भेटाया सर्वही येती वैष्णव वीर सदा । ह्या समयी शुकदेवाने नीज दर्शन दिधले ॥११॥
शुकदेवाच्या चरणी मस्तक ठेवीत असे राजा । ह्या संसारी श्रमलो आता परमामृत पाजा । भागवताचे श्रवण करोनी घे प्रसाद माझ्या । भागवताचे प्रथम स्कंदे शौनक ऐकियले स्कंदे शौनक ऐकियले । पर पुरुषोत्तम परिक्षीतीने हृदयातंरी जतीले ॥१२॥