आज बाई आनंदी आनंद झाला, नंदाच्या घरे आज गोपाळ काला । रीमझिम रीमझिम पाऊस आला, नटली सारी सृष्टी बाला, बहरी आला पारिजातका नंदाच्या ॥१॥
ने साग तुम्ही पैठणी शेला, जरी काचोली अंगात घाला, गोप्याभाळी कोर ही लावा नंदाच्या ॥२॥
गळ्यात घाला पाचूच्या माला कर्णभूषणे कुंडल घाला, गोप्या हातामध्ये बिलवर घाला नंदाच्या ॥३॥
गोविंद आला गोपाळ आला, रूणुझुणु पायी वाजे वाळा, दह्या दुधाचे जेवण आणा नंदाला, नंदाच्या घरी आज गोपाळ काला ॥४॥