॥ जयाच्या कृपेने, मुका ही वाचाळ, लघूनि अचळ, पंगू जार ॥१॥
॥ वंदूंत्यामाधवा, आनंद दायका, वैकुंठ नायका, आत्मारामा ॥२॥
॥ आत्मारामविष्णू, गाता बंधतुटे, अंटरींच भेटे, विष्णुमूर्ति ॥३॥
॥ विष्णुदिव्यनामें, मुनिगाति प्रेमें, तीचाभंगानें, आम्हीगाऊं ॥४॥
॥ गाऊंश्लोकपाद, अभंगाचेपायी, स्वात्मसुखहोई, नामें गाता ॥५॥
॥ नामेंनिर्गुणाची, गुणींविस्तारली, अर्थीं भिन्नझालीं, एकाविष्णू ॥६॥
॥ एकाविष्ण्चेच, अनंतहेगुण, यथाशक्तिगान, करुंत्याचें ॥७॥
॥ करुजरिगान, मराठी अभंगा, तरि आम्हीरंगीं, भावें रंगू ॥८॥
॥ रंगूआह्मीनित्य, गात विष्णूनामे, आनंदाच्याप्रेमें, भरूं दाट ॥९॥