प्रस्तावना
आरंभी सूत्रें अनष्टुप श्लोकाचें चरणरूप असून स्तुतिपर आहेत.
॥ मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिम् । यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम् ॥१॥
श्री माधव कृपेनें या मूकाकडून श्री विष्णुनाम गीता बोलविली. मूकत्वामुळें त्यांत अबद्धवाणी पडली असेलच तथापि सज्जनांनीं त्या दोषाकडे न पाहतां हंसा प्रमाणें नामामृत सारच गृहण करावें. “ आर्या - मूक मोलजरि अशुद्ध श्रीयश जयांत समग्र भरपूर । श्री विष्णुनाम गीता गाउन साधू करोत भवदूर ॥१॥ इतकीच प्रार्थना आहे.
ह्या गीते विषयीं काहीं उल्लेख करण्यांत येत आहे, तो असा की आरंभी सूत्रें अनष्टुप श्लोकाचें चरणरूप असून स्तुतिपर आहेत. त्यांत श्लोकांचे आरंभींचे नामें असून श्लोकांचे गणनेंसाठीं केशवादिक्रम व पुढें संज्ञिक शब्दांची योजना केली आहे, नंतर नामवृत्त्या आहेत. त्यांतच मूळ सहस्र नामाचा पाठ होत आहे. कांहीं नामांवर श्रुत्यादिकांची वचनें ही दिली आहेत. नंतर जीं सूत्रें दिलीं आहेत त्यांत तर किती श्लोकांनीं कोणत्या नामापावेतो किती नामें झालीं हें ही समजतें. व ती सूत्रें स्तुतिपर ही आहेत. प्राकृत भजनांत श्लोकांचीं आदिमांतिम दोन्ही नामें असून, स्तुतिपर ही आहेत. नंतर जे अभंग आहेत त्यांत आरंभीं नामें असल्यामुळें पदेंच साविलीं आहेत. अभंगाचे शेवट चरणांत केशवादिक्रमीं परादिवाचेचा उपयोग ९६ श्लोका पर्यंत होऊन पाचवें केशवादि आवर्तन पद्मनाभ ११ व्या श्लोकापर्यंत १०७ श्लोक झाले आहेत. सहस्र शब्द अनंतवाची आहे. अनंताचे वर्णन होतच नाहीं. तथापि सहस्रानें दिग्दर्शन मात्र होतें, यांत जी नामें वारंवार आलीं आहेत तीं आदरार्थ आहेत. तसेंच कांहीं नामें सविशेषण व कांहीं सबंध चरणाचीं आहेत.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP