मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|द्वितीय परिच्छेद|
ऋषिपंचमी व्रत

धर्मसिंधु - ऋषिपंचमी व्रत

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


भाद्रपद शुक्लपंचमी ऋषिपंचमी होय. ही मध्याह्नव्यापिनी घ्यावी. दोन दिवस मध्याह्न असेल अथवा दोन्ही दिवस नसेल तर पूर्व दिवसाची घ्यावी. या दिवशी ऋषींचे पूजन करून न नांगरलेल्या जमिनीत उत्पन्न झालेल्या शाकांचा आहार करावा. भाद्रपद शुक्ल दिवशी स्नान, सूर्याचे पूजन व पंचगव्याचे प्राशन ही केली असता अश्वमेधाहून अधिक मिळते. ही सूर्यषष्ठी सप्तमीने युक्त असेल ती घ्यावी. या षष्ठीचेच दिवशी कार्तिक स्वामीचे दर्शन घेतले असता ब्रह्महत्यादि पापांचा नाश होतो. भाद्रपद शुक्ल अष्टमीला दूर्वाष्टमी म्हणतात ही पूर्व दिवसाची घ्यावी. ज्येष्ठा व मूळ नक्षत्रांनी असेल ती त्याज्य होय. दुसरी नसेल तर तीही घेण्यास हरकत नाही. हे दूर्वापूजन व्रत कन्याराशीला सूर्य असता आणि अगस्त्योदय असता करू नये. हे व्रत स्त्रियांना नित्य आहे. या दिवशी ज्येष्ठादेवीचे पूजन व व्रत केवल अष्टमी प्रधान असेल तेव्हा, अथवा केवल ज्येष्ठा नक्षत्र प्रधान असेल तेव्हा करावे असे सांगितले आहे. दाक्षिणात्य लोक केवळ ज्येष्ठा नक्षत्र करतात. हे व्रत अनुराधा नक्षत्री आवाहन, ज्येष्ठा नक्षत्री पूजन आणि मूळ नक्षत्री विसर्जन असे तीन दिवसाचे आहे. आवाहन व विसर्जन यांचे दिवसांचा निर्णय पूजन दिवसांच्या अनुरोधाने जाणावा. जेव्हा पूर्व दिवशी मध्याह्नाला ज्येष्ठा नक्षत्राला आरंभ होऊन दुसर्‍या दिवशी मध्याह्नी अथवा मध्याह्नापूर्वी समाप्त होत असेल तेव्हा पूर्वदिवशीच पूजन करावे. जेव्हा पूर्व दिवशी मध्याह्नानंतर आरंभ होऊन दुसर्‍या दिवशी मध्याह्नी समाप्ति होत असेल तेव्हा अष्टमीयोग असेल त्याप्रमाणे पूर्वदिवसाची अथवा दुसर्‍या दिवसाची घ्यावी. दोन दिवस अष्टमीयोग असल्यास पूर्वदिवसाचीच घ्यावी. जेव्हा पूर्वदिवशी मध्याह्नापासून अथवा मध्याह्नानंतर आरंभ असेल आणि दुसर्‍या दिवशी मध्याह्नानंतर अपराह्णापर्यंत स्पर्श आसेल तेव्हा अष्टमीयोग नसला तथापि दुसर्‍या दिवसाचीच घ्यावी.

N/A

References : N/A
Last Updated : May 03, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP