मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथि महाराष्ट्रात चंपाषष्ठी या नावाने प्रसिद्ध आहे. ही तिथि जर दोन दिवस असेल तर, रविवार, मंगळवार, शततारका आणि वैधति यांतून जितके अधिक योग असतील ती पहिल्या दिवसाची अथवा दुसर्या दिवसाची, सहा घटका असणारी घ्यावी. दोन्ही दिवशी योग नसल्यास दुसर्या दिवसाची सहा घटका व्यापिनी असणारी घ्यावी. हिलाच स्कंदषष्ठी असे म्हणतात. ती पूर्वविद्धा घ्यावी. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला सूर्यव्रत करावे. त्याचा विधि कौस्तुभात पाहावा. मृगनक्षत्र असणार्या मार्गशीर्ष पुनवेला मीठ दान दिले असता सुंदर रूप मिळते.