तिसर्या परिच्छेदात जो सांगितला आहे तो पाहावा. दरमहाच्या शिवरात्रीचा निर्णय पहिल्या परिच्छेदात सांगितलाच आहे. शिवरात्रिव्रताच्या उद्यापनाची माहिती, कौस्तुभ वगैरे ग्रंथात पहावी. मासशिवरात्रीव्रताच्या उद्यापनाची माहिती कौस्तुभात सविस्तर दिलेली आहे. माघी अमावास्या युगादि असल्याने, त्या तिथीला अपिण्डकश्राद्ध करावे. त्यासाठी अमावास्या अपराह्णव्यापिनी घ्यावी. हे श्राद्ध दर्शश्राद्धाबरोबरच तंत्राने करावे. याच अमावायेला जर शततारका नक्षत्राचा योग असेल, तर तो मोठा पुण्यकाळ असतो. या प्रयोगावर श्राद्ध केल्याने, पितरांची अत्यंत तृप्ति होते. याप्रमाणे श्रीमदनंतोपाध्यायांचे पुत्र जे काशीनाथोपाध्याय, त्यांनी रचिलेल्या धर्मसिन्धुसारातल्या माघ महिन्यातल्या कृत्यांचा निर्णय येथे पुरा झाला.