'जे थोर लोक देहत्याग करतात, ते मोक्षाला जातात.
(ये व तन्वं विसृजन्ति धीरास्ते जना सो अमृतत्वं भजन्ते)
असे वेदवाक्य आहे, ते गंगा व यमुना यांचा संगम आणि माघ महिना याबद्दलचे आहे. याचे कारण असे की, माघ महिन्यात (प्रयागी) देहत्याग करणाराला निःसंशय मोक्ष मिळतो असे (श्रुतिच्या वरील वचनाच्या आधारेच) ब्रह्मपुराणात सांगितलेले आहे. इतर महिन्यात, तेथे देहत्याग केल्यास जी स्वर्गप्राप्ति होते, तिचा प्रयोग येणेप्रमाणे - यथाशक्ति सर्व प्रायश्चित्त करून, आपले श्राद्ध करणारा जर कोणी नसेल तर स्वतः आपले जिवंतश्राद्ध सपिंडीकरणासह करून, गोदान केल्यावर उपास करावा. पारणे केल्यानंतर, आपल्याला जो कोणचा लोक हवा असेल त्याचा उल्लेख करून संकल्प करावा. या जिवंतश्राद्धाचा प्रयोग कौस्तुभात पहावा. माघ महिन्याबद्दल 'तिलस्नायी, तिलोद्वर्ती, तिलहोमी, तिलोदकी, तिलभुक् व तिलदाता' अशा सहांचा पापनाश होतो असे वाक्य आहे. यांत 'तिलस्नाय' असे पद असल्याने, तिलयुक्त पाण्याने स्नान करावे. तिलोदक सांगितले आहे म्हणून, तिलमिश्रित पाण्याने देवपूजा, तर्पण, संध्या, पाणी पिणे वगैरे करावीत. हा तिलहोम जो तीन प्रकारचा आहे तो असाः -
१. दहा हजार होम
२. लक्ष होम व
३. कोटि होम. हे होम सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहेत. या होमाचा कुंडमंडपनिर्णयासह जो सर्व प्रयोग कौस्तुभात व मयूरादिकांत दिला आहे तो पहावा.