फाल्गुन वद्य प्रतिपदेला वसन्ताच्या प्रारंभाचा उत्सव करावा. ही प्रतिपदा सूर्योदयव्यापिनी असेल, तर पहिल्या दिवसाची घ्यावी. या दिवशी तैलाभ्यंग करण्यास सांगितले आहे. या प्रतिपदेला आंब्याचा मोहोर खावा, त्याचा प्रकार असा- गाईच्या शेणाने सारवलेल्या घराच्या अंगणात पांढर्या वस्त्राच्या आसनावर पूर्वाभिमुख करून बसावे. नंतर सुवासिनीकडून चंदनाचा टिळा लावून घेऊन, नीरांजन ओवाळून घेतल्यावर चंदनयुक्त आंब्याचा मोहोर-
'च्यूतेमग्र्यं वसन्तस्य माकन्दकुसुमंतव ।
सचन्दनं पिबामद्य सर्वकामार्थसिद्धये ।
हा मंत्र म्हणून खावा.