मंगळवारयुक्त कार्तिकी षष्ठीला अग्निपूजा करून त्याच्याचसाठी ब्राह्मणभोजन घालावे.
गोपाष्टमी - कार्तिकशुद्ध अष्टमी ही गोपाष्टमी होय. या तिथीला जर गाईला प्रदक्षिणा घालून तिच्या मागे रानात जाण्याची वगैरे कृत्ये केली तर इच्छित गोष्टी प्राप्त होतात.
मथुराप्रदक्षिणा - कार्तिकशुद्ध नवमीला मथुरेला प्रदक्षिणा करावी. ही तिथि युगादि आहे. ही तिथि पूर्वाह्णव्यापिनी असता अपिंडक श्राद्ध करावे. यासंबंधाने विशेष माहिती मागे वैशाखप्रकरणात दिली आहे.