सूर्याच्या वृषभसंक्रांतीनंतर सातव्या दिवशी अगस्त्य अस्ताला जातो आणि सिंहसंक्रांतीनंतर एकविसाव्या दिवशी उदय पावतो. संक्रांतीच्या पुर्वीच्या सात दिवसांमध्ये अगस्त्य पूजन्म, अगस्त्याला अर्घ्य इत्यादि करावे. भाद्रपद पौर्णिमेचे दिवशी प्रपितामहाच्या पुढचे तीन जे पिता, पितामह, प्रपितामह सपत्नीक व वसुरुद्रादिरूप व मतामहादि तीन सपत्नीक यांच्या उद्देशाने श्राद्ध करावे. हे श्राद्ध पार्वणरूप आहे याकरिता अपराह्नकली,पूरूरवार्द्रवदेवयुक्त असे सपिंडक करावे. प्रपितामहाची जी पिता इत्यादि त्रयी त्यांच्याच उद्देशाने नांदीश्राद्ध धर्माने सत्य वसुदेव युक्त श्राद्ध करावे मातामहादिकांचा उच्चार करू नये. असे कोणी म्हणतात. हे प्रोश्ठपदी शास्त्र पंधरा दिवसातून एकदा महालय पक्षाचे ठिकाणी आणि सर्व कृष्णपक्षव्यापि महालयापक्षाचे ठिकाणी आवश्यक आहे पंचमी इत्यादि महालय पक्षाचे ठिकाणी आणि सर्व कृष्णपक्षव्यापि महालयपक्षाचे ठिकाणी आवश्यक आहे. पंचमी इत्यादि पक्षाचे ठिकाणी कृताकृत आहे.