माघशुद्ध सप्तमी ही रथसप्तमी होय. ही अरुणोदयव्यापिनी घ्यावी. हिची अरुणोदयव्याप्ति जर दोन दिवस असेल, तर पहिल्या दिवसाचीच घ्यावी. ज्यावेळी एक घटकावगैरे थोडी षष्ठी असून, सप्तमीचा क्षय असल्याने, ती दुसर्या दिवशी अरुणोदयाच्या आधी संपत असेल, त्यावेळी षष्ठीयुक्त असलेली सप्तमी घ्यावी. त्या षष्ठीत सप्तमीच्या क्षयघटका मिळवून, अरुणोदयाच्या वेळी स्नान करावे. या व्रतात षष्ठीला एकभुक्त राहून, सप्तमीला अरुणोदयी जे स्नान करावे त्याचा मंत्रः -
'यदाजन्मकृतं पापं मया जन्मसु जन्मसु ।
तन्मेरोगंच शोकंच माकरी हन्तु सप्तमी ॥
एतज्जन्मकृतं पापं यच्च जन्मान्तरार्जितम् ।
मनोवाक्कायजं यच्चज्ञाता ज्ञातेच ये पुनः ॥
इति सप्तविधं पापं स्नानान्मे सप्तसप्तिके ।
सप्तव्याधिसमायुक्त हर माकरि सप्तमी ॥
अर्घ्यमंत्र 'सप्तसप्तिवह प्रीत सप्तलोकप्रदीपन ।
सप्तमी सहितोदेव गृहाणार्घ्य दिवाकर ॥
ही सप्तमी मन्वादिसुद्धा आहे. ही शुद्ध पक्षातली मन्वादि असल्याने पूर्वाह्णव्यापिनी घ्यावी असे सांगितले आहे.