वस्त्रासह स्नान केल्यावर, जो सशक्त असेल त्यानें ओलेत्यानेंच ब्राह्मणसमुदायापुढें एक गाय व एक बैल यांचा प्रतिनिधि म्हणून निष्काच्या किंमतीइतका ब्रह्मदण्ड ठेवून साष्टांग नमस्कार घालावा व नंतर ब्राह्मणांना प्रदक्षिणा घालून
’सर्वे धर्मविवक्तारो गोप्तारः सकला द्विजाः ।
मम देहस्य संशुद्धिं कुर्वंतु द्विजसत्तमाः ॥
मया कृतं महाघोरं ज्ञातमज्ञातकिल्विषम् ।
प्रसादः क्रियतां सह्यं शुभानुज्ञां प्रयच्छय ॥
पूज्यैः कृतपवित्रोहं भवेयं द्विजसत्तमाः ।’
अशी प्रार्थना करावी आणि ’मामनुगृह्वन्तु भवन्तः’ (माझ्यावर तुम्ही अनुग्रह करा) असें म्हणावें. ब्राह्मणांनीं ’किं ते कार्यं । मिथ्या मावादीः । सत्यमेव वद’ (तुझें काय काम आहे ? खोटें बोलूं नकोस. खरें सांग.) असें विचारल्यावर आपलें काम सांगावें तें असें :-
’मया मम पत्न्या वा इहजन्मनि जन्मान्तरे
वा अनपत्यत्वमृतापत्यत्वादिनिदानभूतबालघातविप्ररत्नापहारादि
दुरितं कृतं तस्य नाशाय करिष्यमाणे
हरिवंशश्रवणादौ कर्मविपाकोक्ते विधानेऽधिकारार्थं
दीर्घायुष्यपुत्रादि सन्ततिप्राप्तये प्रायश्चित्तमुपदिशंतु भवन्तः’
अशी प्रार्थाना केल्यावर, ब्राह्मणांनीं--पूजा केलेल्या अनुवादकाजवळ (दुभाष्या) ’षडब्दत्र्यब्द्सार्धाब्दान्यतम प्रायश्चित्तेन पूर्वात्तरांगसहितेनाचरितेन तव शुद्धिर्भविष्यति तेन त्वंअ कृतार्थो भविष्यसि’ असें सांगावें व तें त्यानें पाप्याला (प्रायश्चित्तेच्छूला) सांगावें. त्यानंतर प्रायश्चित्त करणारानें ’ॐ’ असें म्हणून ब्राह्मणसभेचें विसर्जन करावें. तसें केल्यावर देशकालादिकांचा उच्चार करुन,
सभार्यस्य मम एतज्जन्मजन्मान्तरार्जितानपत्यत्वमृतापत्यत्वादि निदानभूतबालघातविप्ररत्नापहारादिजन्यदुरितसमूलनाशकर्मविपाकोक्तविधानाधिकार--
सिद्धिद्वारा दीर्घायुष्मद्वहुपुत्रादिसन्ततिप्राप्तये षडब्दं त्र्यब्दं सार्धाब्दं वा प्रायश्चित्तं
पूर्वोत्तराङ्गसहितं (अमुक) प्रत्यान्मायेन अहं आचरिष्ये’---
असा संकल्प करावा व दोन प्रहरीं क्षौर करुन स्नान करावें.
आयुर्बलं यशोवर्चः प्रजाः पशुवसूनिच ।
ब्रह्मप्रज्ञांच मेघांच त्वं नोदेहि वनस्पते ॥’
अशी वनस्पतीची प्रार्थना करावी आणि योग्य काष्ठानें दन्तधावन केल्यावर दहा स्नानें करावींत. भस्मस्नान करावें. ’ईशानाय नमः’ या मंत्रानें मस्तकाला, ’तत्पुरुषायनमः’ या मंत्रानें तोंडाला, ’अघोरायनमः’ या मंत्रानें हृदयाला, ’वामदेवायनमः’ या मंत्रानें गुह्यस्थानाला, ’सद्योजातायनमः’ या मंत्रानें पायांना आणि प्रणव (ॐ) या मंत्रानें सर्वांगाला भस्म लावावें. अथवा ’ईशानादि’ पदांनीं युक्त असे सर्व मंत्र म्हणून (सर्वांगाला) भस्म लावावें.