राजा, शिष्ट व बन्धुवर्ग या सर्वांची संमति मिळवून, संकल्पापासून आचार्याच्या पूजेपर्यंत--मागें सांगितल्याप्रमाणें कर्म करावे. ब्राह्मणभोजनाचा संकल्प झाल्यानंतर आचार्याने देवयजनादिप्रणीतयात्रापर्यंत (सर्व) कर्म करावें. नंतर मुलगा दत्तक घेणार्यानें (तो) देणार्यापाशीं जाऊन, ’मला पुत्र दे’ अशी स्वतः मागणी करावी. देणार्यानें ’मी देतों’ असें म्हणावें. त्यानंतर (पुत्र) देणार्यानें संकल्प वगैरे सर्व पुत्रदानापर्यंतचें वर सांगितल्याप्रमाणें कर्म करावें. पुत्र घेणार्यानें ’धर्मायत्वागृह्वामिसन्तत्यैत्वागृह्वामि’ या मंत्रानें पुत्राला घेऊन, त्याला वस्त्रालंकारांनी विभूषित करावें. आचार्यानें दर्भांच्या बर्हि (समिधा) व पळसाच्या इध्मा (समिधा) मिलवून परिधानादिक अग्निमुख करुन, चरुश्रपण (भात शिजवणें) करावें. त्यानंतर आसादनापर्यंतचें कर्म झाल्यावर पूर्वाङ्गहोम करावा. ’यस्त्वाहृदाकीरिणा०’ हा पुरोनुवाक्या मंत्र म्हणून ’यस्मैत्वं सुकृते०’ या आहुती देण्याया (याज्य) मंत्रानें होम करावा. व्यस्त (व) समस्त व्याहृतिमंत्रांनीं आहुति देऊन स्विष्टकृत् होम करावा. आचार्याला-दक्षिणा, वस्त्रें, कुंडलें व अंगठी-हीं द्यावींत.