मूळ, ज्येष्ठा, व्यतीपात वगैरेंवर जन्म व पावलेल्या पुत्राच्या पित्यानें, पुत्राचा जन्म झाल्याबरोबर--कुलदेवता आणि वडील माणसें--यांना नमस्कार करुन पुत्रमुख पाहावें व नंतर नदीवर जाऊन उत्तराभिमुखानें स्नान करावें. जवळपास नदी नसल्यास, घरीं आणिलेल्या थंड पाण्यात सोन टाकून, त्याचें स्नान करावें. रात्र असली तरी नदींतच स्नान करावें. अशक्तानें रात्रीं अग्नीजवळ शीतोदकानें स्नान करावें.