दर्शांत ज्याचा जन्म होतो त्याच्या आईबापांना दारिद्रय येतें; यास्तव त्या दोषाच्या परिहारासार्थ शान्ति सांगतों. ’अस्य० दर्शजननसूचितारिष्टनिरासार्थं शान्तिं करिष्ये’ असा संकल्प केल्यावर, स्थंडिलाच्या पूर्वेकडे कलश मांडावा व कलश आणि अग्नि यांच्यामध्यें सर्वतोभद्रपीठावर ब्रह्मादि मंडलदेवतांचें आवाहन करावें. त्याच्या मध्यभागीं ’येचेह०’ या मंत्रानें सोन्याच्या प्रतिमेंत पितरांचें आवाहन करावें. त्यांच्या दक्षिणेस रुप्याच्या प्रतिमेंत ’आप्यायस्व०’ या मंत्रानें सोमाचें आवाहन करावें. उत्तरेस तांब्याच्या प्रतिमेंत ’सविता पश्चात्तात्० ’ या मंत्रानें सूर्याचें आवाहन करावें. नंतर त्यांची पूजा करुन अग्नीची स्थापना करावी आणि सर्वतोभद्रमंडलाच्या ईशान्येस ग्रहांची स्थापना करावी.
’आदित्यादिग्रहान् अमुकसंख्याभिः समित्यर्वाज्याहुतिभिः पितृनष्ताविंशतिसंख्याभिः समिच्चरुभ्यां सोमं सूर्यं च
प्रत्येकमष्टथोरशतसंख्यसमिच्चर्वाहुतिभिः शेषेण स्विष्टकृतमित्यादि’
असें अन्वाधान करावें. येथें स्विष्टकृताच्या आधीं माता, पिता व बालक--यांवर कलशांतल्या पाण्यानें अभिषेक करावा व नंतर स्विष्टकृत् होम, बलिदान वगैरे करावींत, असा याचा विशेष समजावा. याप्रमाणें दर्शशान्तीचा निर्णय आहे.