संकल्पाप्रमाणें करुन, व्याहृतिमंत्रानें तुमचा होम, विष्णुश्राद्ध आणि गाय दान देणें हीं कर्में पूर्वींप्रमाणेंच करावींत. तूप व पंचगव्य यांच्या होमांत इध्माधान (अग्नीला समिघ देणें) , स्थालीपाक वगैरे कृत्यें करणें नको, असें कांहीं ग्रंथकार सांगतात. व्याहृतिमंत्रानें जो तुपाचा होम करायचा, त्याची देवता पापनाशक विष्णु ही होय, असें कांहीं ग्रंथकार सांगतात.