’अश्वक्रान्ते रथक्रान्ते विष्णुक्रान्ते वसुन्धरे शिरसाधारयिष्यामि रक्षस्व मां पदे पदे ॥’
या मंत्रानें मातीचें अभिमंत्रण करुन,
’उध्दृतासि वराहेण कृष्णेन शतबाहुना ।
मृत्तिके हर मे पापं यन्मया दुष्कृतं कृतम् ॥’
या मंत्रानें माती हातांत घेऊन, ती ’नमो मित्रस्य०’ या मंत्रानें सूर्याला दाखवावी व नंतर - ’गन्धद्वारां०’ ’स्योना पृथिवी०’ किंवा ’इदं विष्णु’ या तिहींपैकीं हव्या त्या एका मंत्रानेंमस्तकापासून खालीं सर्वांगाला ती लावावी आणि मग दोन वेळां आचमन करावें.