पांचव्या व सहाव्या दिवशीं ’जन्मदा’ नांवाच्या देवतांचें पूजन करावें तें पुढीलप्रमाणें:- रात्रीच्या पहिल्या प्रहरीं पित्यादिकांनीं स्नान करुन आचमन केल्यावर देशकालादिकांचा उच्चार करावा आणि ’अस्य शिशोः समातृकस्यायुरारोग्यप्राप्ति सकलानिष्टशान्तिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं विघ्नेशस्य जन्मदानां जीवन्त्यपरनाम्न्याः षष्ठीदेव्याः शस्त्रगर्भाभगवत्याश्च पूजनं करिष्ये’
असा संकल्प करुन तांदुळाच्या राशीवर गणपति व जन्मदादेवी यांचें नाममंत्रानें आवाहन करावें तें असें:-
’आयाहि वरदा देवि महाषष्ठीति विश्रुते ।
शक्तिभिः सह बालं मे रक्ष जागर वासरे ॥’
भगवतीचें आवाहन नाममंत्रानें करावें आणि
’शक्तिस्त्वं सर्व देवानां लोकानां हितकारिणी ।
मातर्बालमिमं रक्ष महाषष्ठि नमोस्तु ते ॥’
या मंत्रानें षोडशोपचारें पूजा करावी, आणि नंतर
’लम्बोदर महाभाग सर्वोपद्रवनाशन ।
त्वत्प्रसादादविघ्नेश चिरंजीवतु बालकः ॥
जननीसर्वभूतानां बालानां च विशेषतः ।
नारायणीस्वरुपेण बालं मे रक्ष सर्वदा ॥
प्रेतभूतपिशाचेभ्यो शाकिनीडाकिनीषु च ।
मातेव रक्ष बालं मे श्वापदे पन्नगेषु च ॥
गौरीपुत्रो यथा स्कन्दः शिशुत्वे रक्षितः पुरा ।
तथा ममाप्ययं बालः षष्ठिके रक्ष्यतां नमः ॥’
अशी प्रार्थना करुन ब्राह्मणांना दक्षिणादि द्यावींत. रात्रीं जागरण करावें. पांचवीच्या व सहावीच्या संबंधानें दान देण्याघेण्यांत दोष नाहीं. दहाव्या दिवशीं बलिदान करुन, आप्तेष्टांना अन्नदान करावें.