मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १|
संतति विधि

धर्मसिंधु - संतति विधि

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


सोन्याचा बालक करुन पाळण्यासहित त्याचें दान करावें; अथवा वृषभाचें दान करावें अथवा ब्राह्मणाचा विवाह करावा; अथवा महारुद्राचा जप करावा; अथवा लक्ष कमळांनीं शंकराचें पूजन करावें; अथवा; सुवर्णाच्या धेनूचें सवत्स दान करावें; अथवा प्रत्यक्ष सवत्स धेनूचें यथाविधि दान करावें; अथवा घृतानें भरलेल्या कुंभाचें दान करावें; याप्रमाणें दानें संक्षेपानें सांगितलीं. अथवा दररोज पार्थिवलिंगाची पूजा करुन अभिलाषाष्टक स्तोत्राचा जप एक वर्षपर्यंत करावा. अभिलाषाष्टकस्तोत्र कौस्तुभांत सांगितलें आहे. इतकें करुनही संतति प्राप्‍त न होईल तर दत्तक पुत्र घ्यावा.

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP