मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|
आरती गणपतीची

आरती गणपतीची

मध्वमुनीश्वरांची कविता


आरती गणपतीची
संकटशमना पंकजनयना गजवदना । शंकरतनया किंकरपाले सुखसदन । रंक मी अंकित तूझा हिमकर शशिवदना । अभयंकर दे मजला रजनीचरकदना ॥१॥
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती । गणपति मति दे मजला वर्णिन तव कीर्ती ॥ध्रु०॥
मधुरकरमंडित गंडस्थळ वक्रतुंडा । सिंदुरचर्चित साजे सुंदर ते शुंडा । विलसत तूझे उदरीं विद्या उदंडा । पाशांकुश घेउनिया करिसी खलदंडा ॥२॥
चरणींच्या घागरिया रुणझुण वाजती । छुम छुम छुम छुम नादें वाक्या गर्जती । ता थै ता थै नाचत गणपती । उमा शंकर देव कौतुक पाहाती ॥३॥
पूजासमयीं मूषकवहन पाहीन । दूर्वा मोदक सिद्ध लाडू वाहीन । चिंतामणिचे चरणा शरण जाईन । मध्वनाथा सेंदुरवाडा राहीन ॥४॥

आरती गणपतीची
जय जय देव गजानन अगणित गुणसिंधो । सिंदूरारुण विग्रह रणनिर्जित सिंधो ॥ करुणापूर्ण हृदंबुज शरणागतबंधो । तापत्रय विनिबर्हण सुंदर शरदिंदो ॥१॥
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ते । वितर सुमंगल दृष्टिं मयि पापिणि धूर्ते ॥ध्रु०॥
अंकुश परशु सरोरुह पाशांकितपाणे । कलयसि मोदकममलं मधुरं स्वघ्राणे ॥ यत्स्वाध्यायेत्यजपा गायत्र्याप्राणे । क्षिप्रे प्रापयसि त्वं तं वै निर्वाणे ॥जय देव॥२॥
लंबोदर दीनोद्धर सुरवर विघ्नारे । संसृतिपारावारे मामव निःसारे ॥ विलसतु देव मनो मे त्वयि जगदाधारे । स्वामिन् मध्वमुनीश्वर स्वानंदाकारे ॥जय देव॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP