परशुरामाचे पद
मध्वमुनीश्वरांची कविता
द्वितीय युगीं परशुराम होऊनी हरि हा रे ॥ क्षत्रियांसी नाश करी मुनीच्या कैवारें ॥ध्रु०॥
धन्य माय रेणुका जमदग्नि तात रे ॥ क्षत्रियकुल आम्र सकल परशुराम वात रे ॥ नामस्मरण करितांचि बद्ध मुक्त होत रे ॥ काम क्रोध लोभ मोह जाती हेही सारे ॥१॥
धनुष्यबाणपरशुसूत्रजटामंडिता रे ॥ व्याप्यव्यापकावतंस नमो अखंडिता रे ॥ अनुपम जगीं धैर्य तुझें शौर्य पंडिता रे ॥ ब्रह्मचर्य पाहुनियां चकित हे रामा रे ॥२॥
भक्तमानससरोवरीं हंस तूं बरा रे ॥ श्रीपरशुराम परशुराम भजन हे करा रे ॥ भक्तिज्ञान आणि विरागभाव हा धरा रे ॥ मध्वनाथ अंतरांत सतत हाचि गा रे ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 27, 2017
TOP