आरती पांडुरंगाची
मध्वमुनीश्वरांची कविता
पंढरीराया तुजविण वाटे परदेश । म्हणोनि यात्रेचा म्यां धरिला उद्देश ॥ स्वप्नामध्यें येउनी केला उपदेश । पत्राचें तें उत्तर जाणवी जगदीश ॥१॥
जयदेव जयदेव जय पांडुरंगा । चरणीं वाहे गंगा कलिमल ने भंगा ॥ध्रु०॥
पंढरपूराहूनी आलासे निकट । सेंदुरवाडग्रामीं झालासे प्रगट ॥ आतां अपुला महिमा दाखवी उत्कृष्ठ । दर्शनमात्रें वारी सर्वहि संकष्ट ॥२॥
आषाढीं कार्तिकीं भक्त जन येती । पांडुरंगा तूझें दर्शन घेती ॥ पत्र पुष्प फल दक्षिणा देती । ते नर आपुले पूर्वज वैकुंठा नेती ॥३॥
राजसदन क्षेत्रीं धरिला रहिवास । भागिरथीचे तीरीं उद्धरी निजदास ॥ मध्वनाथाचा हा जाणुनि विश्वास । भेटावया आला लक्ष्मीनिवास ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 28, 2017
TOP